शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्रामध्ये अतिशय गुणवत्तापूर्ण कामगिरी करून यशाचा अग्रलेख कायम ठेवणारी अकॅडमी. यामध्ये आपणास तज्ञ मार्गदर्शक वर्ग आवश्यक त्या दर्जेदार नोट्स ,वैयक्तिक मार्गदर्शन विषय निहाय सखोल विश्लेषण व शिक्षक अभिवृत्ती निर्माण करण्याचे गुणवत्तापूर्ण काम या अकॅडमीच्या माध्यमातून इस्लामपूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी / शिक्षकांसाठी होऊ घातलेल्या शिक्षकांसाठी केले जाते. आपण या ठिकाणी प्रवेश घेतला म्हणजे आपण एक दर्जेदार शिक्षक होऊन दर्जेदार समाज घडवण्यासाठी तयार व्हाल. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये भरघोस यश मिळवले याची जणू हमीच आहे.
स्वप्नस्फुर्ती अकॅडमी म्हणजे शिक्षक होऊ घातलेल्या डीएड व बीएड च्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी ग्रामगीताच आहे. साप्ताहिक टेस्ट सिरीज अभ्यासपूर्ण तयार केल्या जातात. त्यामुळे या मधील बहुतांशी प्रश्न आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये पहावयास मिळतात.. शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्याची शंभर टक्के खात्री म्हणजेच स्वप्नस्फुर्ती अकॅडमी.
स्वप्नस्फुर्ती अकॅडमी मधील सर्वच मार्गदर्शकांना अकॅडमीच्या संचालकांना असेच भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्याचे काम सुरू ठेवावे यासाठी मनापासून आभार व अभिनंदन...
स्वप्नस्फुर्ती TET & TAIT मार्गदर्शन केंद्र इस्लामपूर या अकॅडमी मार्फत आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व ते पास झाले. माझ्या पाहण्यात हे महाराष्ट्रातील पहिले असे मार्गदर्शन केंद्र आहे जिथे फक्त आणि फक्त शिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. ॲकॅडमीचे संस्थापक मा. प्रा. श्री. कृष्णा रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला आदर्श शिक्षक घडविण्याचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे.
कारण एवढे नाव कमविणे एखाद्या सामान्य माणसाला खूप अवघड असते. यासाठी प्रा. कृष्णा रोकडे सर यांनी खूप मेहनत घेतली आणि याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड ला पण घ्यावी लागली. महाराष्ट्रात केलेला हा प्रयत्न खरच येणाऱ्या पिढीला उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
या कामासाठी माझ्याकडून स्वप्नस्फुर्ती अकॅडमीस खूप खूप शुभेच्छा...!
खरचं येते स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो...
नमस्कार मित्रांनो,
स्वप्नस्फुर्ती TET,CTET मार्गदर्शन केंद्र, इस्लामपूर, जि.सांगली या अकॅडमीचे संस्थापक प्रा. श्री कृष्णा रोकडे सर हे गेली 5 वर्षापासून आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन करत आलेले आहेत. सर हे TET व CTET सलग 11 वेळा पास झालेले आहेत आणि त्यांची INDIA BOOK OF RECORD मध्ये नोंद झालेली आहे.
सरांनी मला मराठी विषयाचे चांगले मार्गदर्शन केले होते. मला PSI बनवण्यात सरांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सरांकडे अचूक निरीक्षण शक्ती,योग्य ज्ञान , योग्य मार्गदर्शन मिळते. त्यांची विविध विषयावरील पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . जे की TET व CTET तसेच शिक्षक भरती साठी अत्यंत उपयुक्त आहेत.
सरांच स्वप्न स्वतः शिक्षक होऊन मुलांना घडविण्यापेक्षा अनेक शिक्षक घडविणे हे आहे. त्यामुळे सर जे मार्गदर्शन करतात ते सटीक असते म्हणून सर्वांनी सरांचे मार्गदर्शन घ्यावे व यशस्वी व्हावे....
प्रा. कृष्णा सर व त्यांच्या मार्गदर्शक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं व महाराष्ट्रतील प्रत्येक शाळेत सरांचे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू व्हावेत यासाठी सरांना मनःपूर्वक शुभेच्छा...
मी माझा हा पहिलावहिला अभिप्राय लिहिला, पेक्षा तो माझ्याकडून लिहिला गेला...
मी स्वप्नस्फुर्ती अकॅडमी जॉईन केल्यानंतर कृष्णा रोकडे सरांना मी माझ्या अपयशाबद्दल बोललो त्यांनी मला एका शब्दात सांगितले की धिरज जे आहे त्यात Perfection असूदेत. त्यानंतर मी महिना दीड महिन्याच्या कालावधीत मैत्रीपूर्ण मार्गदर्शनामुळे पहिले वेळी TET आणि दुसरे वेळी CTET दोन्ही परीक्षा पास झालो.
स्वप्नस्फुर्ती अकॅडमीचे सगळेच प्राध्यापक वृंद, हे माझ्या यशाचे मानकरीच. त्यांच्याविषयी लिहले जावे, बोलले जावे, सांगितले जावे असेच आहेत.
जिद्द आणि प्रयत्न यांच्या जोरावर लहानसा पक्षीही गरुड भरारी घेऊ शकतो, हा संदेश प्रा.कृष्णा रोकडे सर आणि त्यांची टीम नी दिला आहे, तो संदेश दशदिशांना पोहोचला आहे ते प्रा. कृष्णा रोकडे सरांच्या विविध पुस्तकांनी सिद्ध झाले आहे...
शेवटी इतकं च...
जिन बातों को
खुद नहीं समझे उन्हे..
स्वप्नस्फुर्ती ने हमे सिखाया हैं |
स्वप्नपूर्ती क्लास मध्ये शिक्षक होण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळते तसेच रोकडे सर म्हणजे तर मित्र मार्गदर्शक असे आहेत. त्यांच्या मार्गदर्शाना मुले मी TET उत्तीर्ण झाले आहे. रोकडे सर ना तर कधीही कोणत्याही बाबतीत मार्गदर्शन मागितले अडचणी सांगितल्या तरीही सर कोणत्याही बाबतीत दिशा दाखवायला तयार असतात..
शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणार्या सर्वांसाठी योग्य मार्गदर्शनसाठी एकमेव ठिकाण म्हणजे स्वप्नस्फूर्ती अकॅडमी हे आहे... येथील सर्व शिक्षक वृंद स्वतः 3 पेक्षा जास्त वेळा TET /C -TET परीक्षा उत्तीर्ण आहेत.. येथे केवळ शिक्षक पात्रता परीक्षे बाबत योग्य व अचूक मार्गदर्शन केले जाते.. मी स्वतः या अकॅडेमीचा विद्यार्थी होतो.. मी B. Ed, 2019 ( द्वितीय वर्षात ) मध्ये असतानाच प्रथम प्रयत्नात C - TET तसेच MAHA TET उत्तीर्ण झालो, याचे श्रेय जाते ते स्वप्नस्फूर्तीचे सर्व शिक्षक वृंद व विशेष करून प्रा. रोकडे सर यांना.
महाराष्ट्र राज्याच्या शासकीय, निमशासकीय व खासगी अनुदानित शाळांच्या मध्ये शिक्षक या पदावर रुजू होण्यासाठी TET ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
TET परीक्षेचे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या अध्यापक विद्यार्थी प्रा.श्री.कृष्णा रोकडे सर यांनी मार्गदर्शन वर्ग सुरु केले आहेत.
प्रा. कृष्णा रोकडे सर अनेक वेळा TET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तरी ज्यांना TET परीक्षा विषयी मार्गदर्शन हवे आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा.